विवाहसंस्कारम. कॉम ही वेबसाईट वैशाख शुक्ल अक्षय्यतृतीया शके 1943, दि 14 मे 2021 रोजी कार्यान्वित झाली आहे.
श्री कुलकर्णी गुरुजी हे पुण्यात अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व आहेत आणि विवाहसंस्कारम चे संस्थापक आहेत. गुरुजींचा ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास विस्तृत आणि बहुअंगी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत अनेकांचे संसार, उद्योग आणि आयुष्याच्या मार्गक्रमणात उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण झाले आहे. गुरुजी ज्योतिष, हस्तरेषा, वास्तू, रत्नशास्त्र पारंगत असून गेल्या चोवीस वर्षांपासून या क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून तर विवाह जुळविण्याच्या सेवा कार्यात गत बावीस वर्षांपासून कार्यरत आहेत. सकारात्मक आणि समर्पक प्रयत्नातून उपवर युवक युवतींचे एक विस्तृत जाळे निर्माण करण्यात ते यशस्वी आहेत आणि एवढेच करून संपत नसते म्हणून अशा उपवर तरुणाईचे पालक, तरुण विवाहित जोडपे आणि समाजासमोर नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करून आपल्या आचार विचारांनी उच्चभ्रू असणाऱ्या विचारवंत, समाजसेवक, अध्यात्मिक व्यंक्तींचे एक व्यापक असे वलय त्यांनी निर्माण केलेले आहे. विवाह जमविणे आणि यथायोग्य रित्या संपन्न करण्याची जी काही प्रस्थापित पद्धत आहे ती दिवंसेदिवस सोपी आणि सरळ कशी करता येईन आणि नको त्या प्रथा कशा वगळता येतील याबद्दल त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
आजपर्यंत त्यांनी शेकडो विवाह नुसतेच जुळवले नाहीत, तर फारकत घेण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक जोडप्यांचे योग्य मार्गदर्शन करून विवाह टिकवलेत देखील आहेत. उपवर मुला मुलींना यथायोग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांचा योग्य जोडीदाराचा शोध उचितरित्या पूर्ण होईन हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
श्री कुलकर्णी गुरुजी हे, पुण्यातीलच नव्हे तर देशातील उच्चनामांकित अशा फर्ग्युसन कॉलेजमधून मानसशास्त्र व व्यवस्थापन शास्त्राचे पदवीधर आहेत.
श्री. प्रशांत जोशी विवाहसंस्कारम चे सहसंस्थापक आहेत आणि या क्षेत्रातील त्याचा दांडगा अनुभव आहे. प्रशांत जोशी हे स्वतः इंजिनीरिंग क्षेत्रातील पदवीधर आहेत, तसेच प्रॉडक्ट डिझाईन विषयात त्यांनी एम टेक देखील केलेले आहे. उच्चशिक्षणानंतर त्यांनी टाटा मोटर्स, एल अँड टी, सिमेन्स, आईडिया; सारख्या बहुराष्ट्रीय उद्योगात विविध महत्वपूर्ण पदांवर काम केले आहे. विवाहसंस्कारम मध्ये ते, तांत्रिक बाजू सांभाळणे आणि दैनंदिन व्यवहारातील सर्व काही सुरळीत चालावे ह्यासाठी प्रयत्नरत असतात.
ऍड. सौ. आसावरी जोशी ह्या विवाहसंस्कारम च्या कायदेविषयक सल्लागार म्हणून अतिशय सक्षमपणे कार्य करतात. त्यांच्या कायदेविषयक सेवांमुळेच विवाहसंस्कारम भक्कमपणे अनेक जोडप्यांचे आयुष्य सावरू शकले आहे.
ऍड. सौ. आसावरी जोशी ह्या संभाजीनगर शहरातील एक प्रख्यात कायदेतज्ज्ञ असून, विवाहविषयक विषयातील कायदेशीर सल्लागार व वकील म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
ऍड. सौ. आसावरी जोशी ह्यांनी कला विषयातील पदवीनंतर आपले कायदेविषयक शिक्षण पूर्ण करून, मास्टर्स इन लेबर लॉज अँड लेबर वेल्फेअर विषयात
पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर कधीही मागे वळून ना बघता विविध समाज उपयोगी कार्यास वाहून घेतले.